जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री  नरसिंह के दुबे चॅरिटेबल ट्रस्ट विशेष कार्यक्रम आयोजित

जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने श्री  नरसिंह के दुबे चॅरिटेबल ट्रस्ट विशेष कार्यक्रम आयोजित

जागतिक महिला दिन 2021

दिनांक 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने श्री  नरसिंह के दुबेचॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित नालासोपारा आयुर्वेद मेडिकल  कॉलेज एवं रुग्णालयामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वसई जिल्हा पालघर येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रोहिणी डोके, हेडकॉन्स्टेबल माधुरी खवळे तसेच अलिबाग  होमिओपॅथिक कॉलेजमधील डॉक्टर आरती गंभीर उपस्थित होत्या .

यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला अध्यापक , महिला अध्यापकेतर कर्मचारी , महिला कनिष्ठ कर्मचारी वर्गाचा तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. स्त्रीरोगप्रसूती तंत्र विभाग प्रमुख एवं संस्थेच्या विश्वस्त प्रोफेसर डॉक्टर ऋजुता दुबे मॅडम यांनी महिलांवरील स्वरचित काव्यरचना सादर केली तसेच अनेक विद्यार्थ्यांनी महिलांबद्दलच्या कविता सादर केल्या व नृत्य नृत्यनाटिका द्वारा सर्व महिलांना सन्मानित केले.

उपनिरीक्षक रोहिणी डोकेयांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की “माझ्यावर महिलांविषयी असणाऱ्या गुन्ह्यांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तपास करत असताना महिला व पुरुष या दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो,अशावेळी अत्याचार हा फक्त स्त्रीवरच होतो असे नाही तर काहीवेळा पुरुष वर्गाला सुद्धा त्यामध्ये फसविण्याचा प्रयत्न केला जात असतो . तरी महिलांनी स्वतःच्या अत्याचारांसाठी न्याय तर जरूर मागावा पण पुरुषांवर खोटे आरोप करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करू नये असे सांगितले” राष्ट्रीय सेवा योजना एकाकातर्फे “choose the challenge”या जागतिक महिला दिन 2021थीम नुसार Accept the challenges” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. त्यामध्ये 24 विद्यार्थ्यांनी भाग घेतला .अंतिम निर्णयांमध्ये प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली.

प्रथम क्रमांक –ऋतुजा कानडे प्रथम वर्ष बीएम एस

द्वितीय क्रमांक -योगिता यादव  द्वितीय वर्ष बीएम एस

तृतीयक्रमांक – दीपाली चव्हाणतृतीय वर्ष बी ए एम एस

या कार्यक्रमामध्ये स्त्रीरोग  प्रसूतीतंत्र विभाग प्रमुख व संस्थेच्या विश्वस्त प्रोफेसर डॉक्टर ऋजुता दुबे, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर हेमलताशेंडे, अध्यापक ,विद्यार्थी अध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक अनुराग द्विवेदी एवं राहील शेख यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here