प्रथमेश परब येतोय प्रेक्षकांच्या भेटीला – ओह माय घोस्ट

प्रथमेश परब येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - ओह माय घोस्ट
प्रथमेश परब येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - ओह माय घोस्ट

प्रथमेश परब येतोय प्रेक्षकांच्या भेटीला – ओह माय घोस्ट

प्रथमेश परब येतोय प्रेक्षकांच्या भेटीला – ओह माय घोस्ट आगामी मराठी चित्रपट ‘ओह माय घोस्ट’चा ट्रेलर २५ जानेवारी २०२१रोजी प्रदर्शित करण्यात आला. मुंबई उपनगरात झालेल्या या शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला गेला. अलीकडे या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ‘जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सना वसिम खान आणि रोहनदीप सिंह यांनी केली आहे. हॉरर कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गाढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Trailer Launch of OMG

https://mumbainews.live/home/
https://mumbainews.live/home/

 

प्रथमेश परब आणि ‘ओह माय घोस्ट’मधील भूताबरोबर गप्पा

प्रथमेश परब येतोय प्रेक्षकांच्या भेटीला – ओह माय घोस्ट वसिम खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आहेत. मोहसीन चावडा हे या चित्रपटाचे लेखक, संवादलेखक आहेत. अतिरिक्त संवादलेखन निखिल लोहे यांचे आहे. हनीफ शेख यांनी अॅक्शन दिग्दर्शनाचे काम पाहिले आहे. संगीत आणि गायन रोहित राऊत यांचे आहे तर कला दिग्दर्शन खुशबू कुमारी यांनी केले आहे. पार्श्वसंगीत सत्या, माणिक आणि अफसर यांचे आहे या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य महाराष्ट्रात औरंगाबाद येथे झाले आहे.

चित्रपट १२ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार 

‘ओह माय घोस्ट’ हा विनोदी पठडीतील मराठी चित्रपट असून ही जग्गू नावाच्या एका अनाथ युवकाची कथा आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनःस्थितीत असताना त्याला स्वप्नात भुते दिसू लागतात. आपण दुर्देवी आणि अभागी असल्याने आपल्या बाबतीत असे होते आहे, असे त्याला वाटू लागते आणि त्याच्या जीवनातील समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भुताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भुतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो आणि हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्यातून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि नवीन पहाट त्यांच्या जीवनात येते.

प्रथमेश परब येतोय प्रेक्षकांच्या भेटीला – ओह माय घोस्ट दिग्दर्शक वसिम खान म्हणाले, “ओह माय घोस्ट’ हा हॉरर चित्रपट असून त्याला विनोदाची फोडणी आहे. लेखक मोहसीन चावडा यांनी अत्यंत सुंदररीत्या या चित्रपटाची कथा लिहिली असून यातील कलाकारांनी सुंदररीत्या या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या आहेत. चित्रपटाच्या टीझरला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मला पूर्ण खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल. कोविडची टाळेबंदी सुरु असताना आम्ही चित्रपटाची तयारी केली आणि सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यावर आता आम्ही प्रेक्षकांसमोर येत आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here