7 हजार किलो मिसळ वर्ल्ड रेकॉर्ड (World record) मास्टर शेफ विष्णू मनोहर

7 हजार किलो मिसळ वर्ल्ड रेकॉर्ड (World record) मास्टर शेफ विष्णू मनोहर

 

पुणे: पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही. पुणे (Pune) जसे पाट्यांसाठी ओळखले जाते तसेच पुणेरी मिसळसाठी (pune misal pav) ओळखले जाते. हीच ओळख आता वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (World record) नोंद करण्यासाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर (Master Chef Vishnu Manohar) पुढे आले आहे. पुण्यात पआयोजन करण्यात आले होते. यामध्ये सात तासात 7 हजार किलो मिसळ शिजवण्याचा तसंच 3 तासात 300 एनजीओच्या मार्फत तीस हजार गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आली. ‘सूर्यदत्ता-विष्णू महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१’मध्ये सात तासांत सात हजार किलो मिसळ शिजवण्याचा, तसेच ही तयार झालेली मिसळ तीन तासांत ३० लोकांच्या मदतीने ३०० ‘एनजीओ’मार्फ़त ३० हजार गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विश्वविक्रम झाला. गिनीज, लिम्का, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स व अन्य रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. ‘सूर्यदत्ता फूड बँक’ आणि ‘सूर्यदत्ता एज्यु-सोशिओ कनेक्ट’अंतर्गत हा उपक्रम झाला. जगात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात मिसळ बनवण्यात आली.
रविवारी पहाटे २ ते सकाळी ९ या सात तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली. तर सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. या महामिसळीसाठी दीड हजार किलो मटकी, ५०० किलो कांदा, १२५ किलो आले, १२५ किलो लसून, ४०० किलो तेल, १८० किलो कांदा-लसूण मसाला, ५० किलो मिरची पावडर, ५० किलो हळद, २५ किलो मीठ, ११५ किलो खोबरे, १५ किलो तेज पान, १२०० किलो मिक्स फरसाण, ४५०० लिटर पाणी, ५० किलो कोथंबीर वापरण्यात आली. त्यातून ही मिसळ झणझणीत, तर्रीदार आणि ठसकेबाज झाली. त्यासाठी ३३ बाय २२ चे चुलवण, १० बाय १० व ७ बाय ७ साईजच्या कढई वापरण्यात आली. त्यामुळे परिसराला भव्यदिव्यतेचे स्वरूप आले होते.
“पुणेरी मिसळ पुण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे महामिसळ तयार करून विश्वविक्रम करावा. या महामिसळच्या माध्यमातून गरजू लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ही महामिसळ तयार झाली. मास्टरशेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महामिसळीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान मिळाले. ” असे ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले.
“सर्वात मोठा पराठा, पाच हजार किलो खिचडी, चार हजार किलो वांग्याचे भरीत, सर्वात मोठा कबाब असे आजवर अनेक विश्वविक्रम केले आहेत. आज प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून खवय्या पुणेकरांसाठी महामिसळ बनविण्याचा विश्वविक्रम झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ बनवताना खूप मजा आली. प्रत्येकी विश्वविक्रमावेळी हजारो लोकांची गर्दी असते. यावेळी मात्र, केवळ २५-३० लोकांमध्ये हा विश्वविक्रम झाला. प्रा. डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्यासह ‘सूर्यदत्ता’मधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी या उपक्रमात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. हा विश्वविक्रम लोकांच्या अनुपस्थित कोरोनाच्या नियमांचे पालन करून झाल्याने एक वेगळाच अनुभव वाटतो आहे,” अशी भावना मास्टरशेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली.
या संस्था घेणार विश्वविक्रमाची नोंद
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक वर्ल्ड रेकॉर्ड, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ रेकॉर्ड, फँटॅस्टिक अचिव्हमेंट अँड रेकॉर्ड, फॅब्युलस रेकॉर्ड्स, इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड, रिपब्लिक वर्ल्ड रेकॉर्ड, उत्तरप्रदेश वर्ल्ड रेकॉर्ड, युके वर्ल्ड रेकॉर्ड, वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड, होप इंटरनॅशनल रेकॉर्ड, वॉव वर्ल्ड रेकॉर्ड, फॉरेव्हर स्टार वर्ल्ड रेकॉर्ड, आसाम बुक ऑफ रेकॉर्ड, बंगाल बुक ऑफ रेकॉर्ड, द वेक ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड, वेक बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल, द ट्रिब्यून इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड, रेझर्स रेकॉर्ड, पॉंडिचेरी बुक ऑफ रेकॉर्ड, ड्रीम हाय इंडिया रेकॉर्ड, ड्रीम हाय वर्ल्ड रेकॉर्ड, गुजरात बुक ऑफ रेकॉर्ड, हिंद बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स आदी संस्थांकडून या विश्वविक्रमी महामिसळची नोंद घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here